Monday, August 11, 2014

हाच तर जिवलग मित्र असतो...

हाच तर जिवलग मित्र असतो...

एक दिवस फोन नाही केला,
तर रागावतो...
फोन केला तरी दोन शिव्या घालतो! 😄

समोरून एखादी फाकडू पोरगी गेली,
तर तिच्यासमोर आपला पोपट करतो,
आणि आपण वैतागलो की
आपल्यावरच खदखदून हसतो!

कॉलेजला आल्यावर पहिला फोन आपल्यालाच करतो,
“कुठे आहेस?” एवढं विचारूनही
आपली पूर्ण चौकशी करतो.

पिकनिकला जायचं असेल,
तर आई-बाबांना मस्का लावायला
हाच पुढे असतो.

बाईकवरून पडलो,
सगळे हसत असताना
हाच धावत येऊन उचलतो.

आपण विसरलो तरी,
वाढदिवशी बारा वाजता
सगळ्यात आधी मेसेज करतो.

परीक्षेच्या वेळी,
“सुपरवायझरला घाल चुलीत,” म्हणत
सप्लिमेंट हातात आणून देतो! 😄

चूक झाली तर ओरडतो,
गरज पडली तर कानही पिळतो,
पण इतर सगळ्यांपेक्षा
आपली काळजी जास्त घेतो.

आपल्या आयुष्याच्या कोऱ्या पानांवर
मैत्रीचे रंग भरत जातो,
आणि कृष्ण-धवल दिवसांमध्ये
हसण्याचे रंग उधळत राहतो.

दुःखात जवळ येऊन विचारतो,
“काय झालं रे?”
आपण नजर चुकवून म्हणतो,
“काही नाही...”

पण आपल्या डोळ्यांत पाहून
हक्काने विचारतो,
“काय रे... एवढा परका झालो का?”

सुखात हक्काने पार्टी मागणारा,
दुःखात रडायला खांदा देणारा,
चुकीच्या वेळी आरसा दाखवणारा,
आणि गरजेच्या वेळी सावलीसारखा उभा राहणारा...

हाच तर जिवलग मित्र असतो! ❤️

No comments:

Post a Comment