Monday, August 11, 2014

सुख दु:ख

माणसाच्या आयुष्यात सुख-दुःखाचं चक्र असंच सुरू असतं. आपण दुःखाला दूर सारण्याचा जितका प्रयत्न करतो, तितकं काही काळापुरतं वाटतं की आता हे दुःख पुन्हा कधीच येणार नाही. पण दुःख हे समुद्राच्या लाटेसारखं असतं. आपण त्याला जितक्या जोराने दूर लोटतो, तितक्याच जोराने ते पुन्हा आपल्या किनाऱ्यावर येऊन धडकतं.

पण जरा त्या मुलाकडे पाहा... काही वेळाने तो पुन्हा आपल्या खेळण्यात रमून जाईल आणि त्या वस्तूला पूर्णपणे विसरूनही जाईल. कदाचित नंतर कधीतरी त्याला तिची आठवण येईल, पण तेव्हा ती वस्तू त्याला त्याच किनाऱ्यावर शोधूनही सापडणार नाही.

दुःखाचंही असंच आहे. ते येतं, आपल्याला स्पर्शून जातं आणि आपण त्याला किती महत्त्व देतो, किती मनात धरून ठेवतो, हे आपल्या हातात असतं.

म्हणून सुख असो वा दुःख, त्यांना स्थितप्रज्ञतेने सामोरं जायला शिकलं पाहिजे. दुःख येणं आपल्या हातात नसतं, पण त्यात किती काळ गुरफटून राहायचं, हे नक्कीच आपल्या हातात असतं.

There will be pain, but whether you suffer or not, that choice is ultimately yours.

No comments:

Post a Comment