श्वेतल (Shwetal),,,❤️❤️
काय बोललात पंधरा दिवसांत, काही उमगलेच नाही,
कधी एकमेकांचे झालात, हेही कळलेच नाही!
पहिल्या भेटीत काय घडलं, याची आम्हाला खबर नाही,
पण तुझ्या चेहऱ्यावरचं ते हसू मात्र लपलं नाही!
‘लिटल इटली’त गप्पा रंगल्या, बुफे झाला अनलिमिटेड,
डाएट विसरून खाल्लंस भरपूर, बहुधा प्रेमाचंच होतं ‘अपडेट’! 😉
मग समुद्रकिनारी तुमच्या मनांनी घेतला असेल निर्णय खास,
आम्हाला काही ठाऊक नाही, पण तुझ्या हसण्यात दिसला विश्वास!
पहिल्या कॉलपासूनच तुझं हसणं काही साधं नव्हतं,
ज्याच्याशी बोलणं कठीण, त्याच्याशी बोलणं सहज होतं!
तेव्हाच जाणवलं, मनात उमलली आहे नवी चाहूल,
‘आस्वाद’च्या नावाने खुलली तुझ्या आयुष्याची नवी फुलबाग सुंदर!
म्हणूनच म्हणालीस, “चला ना जिजू, त्याला सोडायला जाऊ,”
आम्ही म्हटलं, “आवडला नाही,” तरी तू म्हणालीस, “चला ना, जाऊ!” 😭
त्या हट्टातच दिसली मनाची खरी ओढ,
ही गोष्ट गंमतीपलीकडे जाऊन झाली होती गोड!
आधी मनातलं सगळं काही तू जिजूला सांगायचीस,
छोट्या छोट्या गोष्टीही हक्काने माझ्याशी share करायचीस.
आता तुझ्या जगात नवी माणसं, नवी स्वप्नं येतील,
काही गुपितं माझ्याआधी ‘आस्वाद’सोबतच खुलतील! 😉
पण कधी तू फक्त माझी साळी राहिलीच नाहीस,
कधी बहिणीसारखी जवळ आलीस, कधी आईसारखी काळजी घेतलीस.
कधी माझ्यावर रागावलीस, कधी हक्काने समजावून सांगितलंस,
आणि कधी काही न बोलताही मनातलं समजून घेतलंस.
हे नातं नेमकं कधी इतकं जवळचं झालं, कळलंच नाही,
कुठल्या क्षणी तू “आपली” झालीस, त्याची तारीखही नाही.
कदाचित ताईसोबतच्या तुझ्या त्या घट्ट नात्याचीच ही ऊब असेल,
म्हणून माझ्यासोबतही हा जिव्हाळा इतका सहज जुळला असेल. ❤️
आई-बाबा जेव्हा म्हणतात, “तुमचीच पोरगी आहे ती,”
तेव्हा मनात कुठेतरी एक वेगळीच ऊब दाटते ती.
कारण तू फक्त नात्याने आमची झाली नाहीस,
तर मनानेही आमच्या घरचीच एक झालीस. ❤️
म्हणून तुझं लग्न ठरताना आनंद डोळ्यांत भरून आला,
पण त्याच आनंदामागे मनाचा एक कोपरा हळूच भरून आला.
तुला नव्या आयुष्यात पाठवताना हात आनंदाने उंचावतील,
पण तुझ्या गप्पा नसलेल्या घरातले काही कोपरे मात्र शांत होतील.
आस्वाद तुझ्या आयुष्यात आला, हे मनापासून स्वीकारलं आहे,
तुझी काळजी घेणारा सोबती मिळाला, याचं समाधानही आहे.
तू त्याच्यासोबत हसतेस, बोलतेस, मन मोकळं करतेस,
हे पाहून जिजूच्या मनालाही वाटतं, तू छान रमतेयस. ❤️
तुझ्या आयुष्यात आता त्याच्या गप्पांना मोठी जागा असेल,
तुझ्या प्रत्येक आनंद-दुःखात त्याची साथ असेल.
आमच्याशी बोलणं थोडं कमी झालं, हेही जाणवतं मला,
पण तुझ्या नव्या आयुष्यासाठी तेही गरजेचं आहे, हे कळतंय या जिजूला.
फक्त एवढीशी इच्छा, त्या नव्या जगात एक कोपरा राहू दे,
तुझ्या मोकळ्या गप्पांमध्ये माझ्यासाठीही थोडी जागा राहू दे.
सगळं सांगायची गरज नाही, प्रत्येक गोष्ट share करायचीही नाही,
पण कधी मन भरून आलं, तर “जिजू” म्हणायला संकोच करू नकोस काही. ❤️
जिजूचा हक्क तुझ्यावर तसाच राहू दे,
कामाच्या व्यापातून कधीतरी एक फोन माझ्यासाठीही होऊ दे.
जास्त काही बोलायचं नाही, काही विचारायचंही नाही,
फक्त एकदा “जिजू…” म्हण आणि ठेवून दे, एवढंच पुरेसं आहे काही.
आणि कधी माझ्याकडून चूक झाली, कधी रागात काही बोललो,
कधी जास्तच हक्क गाजवला, किंवा नकळत तुला दुखावलं असेल,
तर प्रेमाने मला माफ कर, मनात काही ठेवू नकोस,
जे वाटेल ते सरळ तोंडावर सांग, फक्त मनात दडवू नकोस.
माझं जास्त काळजी घेणं कधी possessive वाटलं,
किंवा माझ्या एखाद्या शब्दाने मनातून तुला वाईट वाटलं,
तर जसं श्यामलाला सांगतेस, तसंच मलाही सांग,
आधीसारखंच मन मोकळं करून माझ्याशी बोलत राह.
कारण आपल्या नात्याला मोठ्या वचनांची गरज नाही,
दोन मोकळे शब्द मिळाले तरी त्याहून मोठी गोष्ट नाही.
वेळ कमी झाला तरी चालेल, भेटी कमी झाल्या तरी चालतील,
पण आपल्या मनातल्या त्या गप्पांच्या वाटा कायम खुल्या राहू देत. ❤️
आता पुढची वाट तुझ्या नव्या आयुष्याची आहे,
नव्या स्वप्नांची, नव्या नात्यांची आणि नव्या जबाबदाऱ्यांची आहे.
स्वप्नं तुझी असू देत, निर्णयही तुझेच राहू दे,
ज्यात मन रमेल, समाधान मिळेल, तेच आयुष्य तुला मिळू दे!
आवडीच्या क्षेत्रात एक दिवस उंच भरारी घेशील,
तुझं यश पाहून जिजू सगळ्यात जास्त खुश होतील.
शुभेच्छा द्यायला धावतच येऊ,
तुझं कौतुक करताना अभिमानाने फुलून जाऊ! ❤️
‘आस्वाद’ची साथ तुझ्या प्रत्येक पावलावर राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा आस्वाद नेहमी येत राहो.
अशीच हसत राहा, प्रेमात नव्याने पडत राहा,
एकमेकांच्या सोबतीने आयुष्यभर फुलत राहा!
‘लिटल इटली’पासून सुरू झालेली ही सुंदर कहाणी,
समुद्राच्या लाटांसारखी अखंड वाहत राहो तुमच्या प्रेमाची निशाणी! ❤️
आणि शेवटी एवढंच, श्वेतल, मनापासून सांगायचं आहे,
तुझं लग्न म्हणजे फक्त तुझ्या आयुष्यातलं नवं पान आहे.
आमच्या नात्याचं पुस्तक मात्र तिथेच संपणार नाही,
फक्त पुढची पानं थोड्या अंतरावरून लिहिली जातील, एवढंच काही.
तू तुझ्या नव्या जगात कितीही रमलीस तरी,
तुझ्यासाठी हा जिजू तसाच उभा राहील मनापासून.
तुझ्या आनंदात सर्वात आधी हसणारा,
तुझ्या यशात सर्वात आधी कौतुक करणारा,
आणि कधी मन भरून आलं तर शांतपणे ऐकणारा…
हा हक्क माझा तुझ्यावर कायम राहू दे. ❤️
आज तू एका नव्या आयुष्याची सुरुवात करतेयस,
आणि आम्ही मनापासून तुला त्या वाटेवर पाठवतोय.
डोळ्यांत आनंद आहे, मनात थोडीशी हुरहूरही आहे,
पण त्याहून मोठी इच्छा एकच आहे…
तू जिथे राहशील तिथे आनंदी राहा,
आस्वादसोबत प्रेमाचा प्रत्येक क्षण मनापासून जगत राहा.
आणि वर्षं कितीही पुढे गेली, आयुष्य कितीही बदललं,
तरी कधीतरी मागे वळून हसत एवढंच म्हणावंस—
“जिजू, मी बदलले आहे का खूप? 😂”
आणि माझं उत्तर कायम एकच असेल…
“अगं वेडाबाई, नाती घर बदलल्याने कुठे बदलतात?
तू आमची होतीस, आहेस…
आणि अशीच कायम आमचीच राहशील.” ❤️